Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून आजोबांनी आपल्या नातवाचा जीव घेतला. ही घटना औद्योगिक पोलीस स्टेशन परिसरातील हाय-टेक सिटीच्या लावयन कुरिया गावाजवळ घडली. सोमवारी शाळेत जात असताना पीयूषचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या कली.
मृतदेहाचे तुकडे केले अन्...हत्येनंतर आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी नातवाचे हात, पाय आणि डोके कापले. त्याचे हात आणि पाय करेरा जंगलात फेकले, तर शीर औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात फेकून दिले. पोलिसांनी आरोपी आजोबा सरन सिंगला अटक केली आहे.
असा झाला खुलासामृत नातवाचे नाव पीयूष असून, तो फक्त १७ वर्षांचा होता. पीयूषची आई कामिनी हिने पोलिसांना सांगितले की, पीयूष सोमवारी सकाळी ८:३० वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता, पण तो घरी परतलाच नाही. शाळेत फोन केल्यावर समजले की, पीयूष शाळेत आलाच नाही. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथके तयार करुन प्रकरणाचा तपास सुरू केला. या दरम्यान, पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. पण काहीही सापडले नाही. या तपासादरम्यान, एका महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने एका व्यक्तीला नाल्यात मृतदेह टाकताना पाहिले आहे. त्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्हीवरुन आरोपी आजोबा सरन सिंगला अटक केली.
ग्रह दोष दूर करण्यासाठी नातवाला संपवलंचौकशी आरोपी आजोबाने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, काही काळापूर्वी त्याच्या मुलीने आणि मुलाने आत्महत्या केली होती. यामुळे तो प्रचंड नाराज होता. दरम्यान, तो एका मांत्रिकाला भेटला. त्याने सांगितले की, तुझ्या अंगात ग्रह दोष आहे. तुला हा दोष संपवायचा असेल, तर तुझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या वयाच्या किशोराचा बळी दे, सगळं ठीक होईल. यामुळे त्याने आपल्या नातवाचा बळी देण्याची योजना आखली.