पत्नीने भावांसह मिळून पतीचे हात-पाय तोडले; जंगलात जिवंत पुरण्यासाठी गेले, पण तिथे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:33 IST2025-08-03T10:33:35+5:302025-08-03T10:33:50+5:30
उत्तर प्रदेशात पत्नीनेच भावांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पत्नीने भावांसह मिळून पतीचे हात-पाय तोडले; जंगलात जिवंत पुरण्यासाठी गेले, पण तिथे...
UP Crime: उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून पत्नीनेच पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पतीचा जीव वाचला आणि ही घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीच्या हत्येची जबाबदारी तिच्या भावांवर सोपवली होती. महिलेच्या ५ भावांनी आणि इतर आरोपींनी पतीला इतकी मारहाण केली की त्याचे हातपाय मोडले. आरोपी मेहुण्यांनी पीडित पतीला जंगलात नेण्यात आले आणि खड्ड्यात जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तसं करु शकले नाहीत आणि पतीचा जीव वाचला.
बरेलीच्या इज्जत नगर परिसरात, पत्नी साधनाने तिचा पती राजीवला मारण्यासाठी मोठा कट रचला होता. साधनाने तिच्याच भावांना तिच्या पतीचे हात आणि पाय तोडण्यास सांगितले. त्यानंतर साधनाच्या ५ भावांनी काही गुंड आणले आणि त्यांच्या राजीवला काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी त्याचा एक हात आणि दोन्ही पाय तोडले. त्यांचा प्लॅन राजीवला संपवून टाकण्याचा होता आणि म्हणून ते त्याला जंगलात घेऊन गेले. त्यांनी राजीवला जमिनीत गाडण्यासाठी एक खड्डाही खोदला होता. पण एक अनोळखी व्यक्ती तिथे आली आणि आरोपी राजीवला तिथेच सोडून पळून गेले. त्या व्यक्तीने रुग्णवाहिका बोलावली आणि राजीवला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
२१ जुलै रोजी साधनाने गुंड पाठवून राजीवला मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर साधनाचा भाऊ भगवान दास, प्रेमराज, हरीश, लक्ष्मण यांच्यासह ११ जण रात्री घरात घुसले आणि राजीवर हल्ला केला. त्याचे राजीवचे हातपाय तोडल्यानंतर त्यांनी त्याला गाडीत बसवले आणि सीबीगंजच्या जंगलात नेले. तिथे एक खड्डा खणण्यात आला आणि त्याला जिवंत गाडण्याची तयारी करण्यात आली. मात्र, नशिबाने राजीवला साथ दिली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली, ज्याला पाहून हल्लेखोर घाबरले आणि पळून गेले.
राजीवने पोलिसांना सांगितले की साधनाने यापूर्वी तीन ते चार वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने जेवणात काच मिसळली होती आणि एकदा तिने विष मिसळले होते. पण प्रत्येक वेळी त्याचा जीव वाचला. राजीव बरेलीच्या नवोदय रुग्णालयात एका डॉक्टरचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतो. त्याने २००९ मध्ये साधनासोबत लग्न केले. पती-पत्नी गाव सोडून बरेली शहरात भाड्याच्या घरात राहत होते.