शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पत्नीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणानं प्रेयसीसमोरच स्वतःवर झाडली गोळी; घडलं होतं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:48 AM

प्रेयसीने प्रियकराला कुण्या दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळाल्यावरून, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यानंतर प्रियकरानेही स्वतःच्या डोक्याला पिस्तुल लावत तिला पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकी दिली होती, असे समजते. 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील (Mirzapur Uttar Pradesh) मडिहान येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या एका प्रियकराने प्रेयसीसमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (suicide) केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. प्रेयसीने प्रियकराला कुण्या दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळाल्यावरून, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यानंतर प्रियकरानेही स्वतःच्या डोक्याला पिस्तुल लावत तिला पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकी दिली होती, असे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसर, ही धक्कादायक घटना मडिहान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रैकरा गावात घडली. रामविलास बिंद, असे या प्रियकर युवकाचे नाव आहे. तो गोल्या दोन वर्षांपासून आपल्या प्रेयसीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता.  बिंदने घरापासून सुमारे 250 मीटर अंतरावर आपल्या प्रेयसीसमोरच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. रामविलास बिंद सोबत गाडीत कुणी महिला असल्याची माहिती प्रेयसीला मिळाली होती. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता.

भांडणादरम्यान, संबंधित प्रेयसीने प्रियकराला मदिहान पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याची धमकी दिली. यानंतर ती बाहेर पडली. यावर, तिला समजावण्यासाठी रामविलासही आपली कार घेऊन तिच्या मागे निघाला. घरापासून सुमारे अडीचशे मीटर अंतरावर गेल्यानंतर, तो कारमधून खाली उतरला आणि प्रेयसीसमोर जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्रेयसी ऐकायला तयार नव्हती. यानंतर रामविलासने आपल्या जवळील अैध पिस्तुल डोक्याला लावूनही तिला स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी दिली. मात्र, तरीही ती ऐकायला तयार नव्हती. 

यानंतर, अखेर रामविलासने प्रेयसी समोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार शैलेश राय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित पिस्तूल ताब्यात घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मृतदेहाजवळच रडत असलेल्या प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस