शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

29 दिवसांपासून फासावर लटकत होता पतीचा मृतदेह, सांगाडा झालेला पाहून पत्नी बेशुद्ध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:12 IST

पतीशी भांडणानंतर पत्नी घर सोडून गेली, महिन्याभरानंतर परतल्यावर पतीचा सांगाडा दिसला.

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीचा मृतदेह 29 दिवस फासावर लटकलेल्या अवस्थेत राहिला. इतक्या दिवसात त्याच्या मृतदेहाचा सांगाडाही झाला होता. पतीवर नाराज होऊन घरातून निघून गेलेली पत्नी महिनाभरानंतर परतली आणि पतीचा सांगाडा पाहून बेशुद्ध पडली. ही घटना कानपूरमधील बिल्हौर भागात निर्जन ठिकाणी असलेल्या एका घरात घडली आहे. या भागात सर्वसामान्यांचे येणे-जाणे नगण्य आहे. त्यामुळे 29 दिवसांपासून घरात लटकलेल्या मृतदेहाचा सांगाडा झाल्याचा सुगावाही कोणालाही लागला नाही. सध्या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

आत मृतदेह अन् घराला कुलूपपोलिसांनी सांगितले की, या तरुणाचा मृतदेह कधीपासून लटकत होता, त्याचा तपास आधी केला जात आहे. त्याने आत्महत्या केली असेल तर त्याच्या घराच्या बाहेरच्या दाराला कुलूप कसे आणि कोणी लावले? कानपूरच्या अरौल पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना घडलेल्या गावाचे नाव गिलवत अमीनाबाद आहे. सुदामा शर्मा (30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घरात सुदामा पत्नी कीर्ती आणि दोन मुलांसह राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदामा वडील आणि इतर दोन भावांपासून विभक्त झाला होता. हे कुटुंब ज्या घरात राहत होते ते घरही गावाबाहेर आहे. त्यामुळे सुदामाच्या घरी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या भेटी कमी होत्या. 

बायको रागावून निघून गेलीपोलिस चौकशीत पत्नी कीर्तीने सांगितले की, 18 डिसेंबर 2022 रोजी तिचे पती सुदामासोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती मुलांसह उत्तरपुरा येथील मेहुणीच्या घरी गेली. 21 डिसेंबरपर्यंत पती-पत्नी मोबाईलवर बोलत राहिले. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरील संभाषणही बंद झाले. सुदामाने गळफास लावून आत्महत्या केली असेल, तर त्यांच्या घराचे कुलूप कोणी आणि का लावले असेल, याचाही तपास पोलिस करत आहेत. कारण घटनेनंतर पोलिसांना घराबाहेर कुलूप लटकलेले आढळले. पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या घराच्या दारात अशी व्यवस्था आहे की आतून कुलूप लावता येते. पोलीसही या वस्तुस्थितीची पडताळणी करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस