'दृश्यम'सारखी घटना; मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, मृतदेह १०० km दूर नेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:00 IST2025-09-19T17:59:23+5:302025-09-19T18:00:00+5:30

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

UP Kanpur Crime, Son kills father with help of friend, takes body 100 km away and burnt it | 'दृश्यम'सारखी घटना; मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, मृतदेह १०० km दूर नेला अन्...

'दृश्यम'सारखी घटना; मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, मृतदेह १०० km दूर नेला अन्...

कानपूर: कानपूरमध्ये दृश्यम चित्रपटातील हत्येसारखी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या मित्राच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह कानपूरहून औरैया येथे घेऊन गेले. वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसराला हादरवून टाकला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, १२ जून २०२५ रोजी कमलापती तिवारी यांच्या पत्नीने कल्याणपूर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हा एक साधा बेपत्ता व्यक्तीचा खटला असल्याचे दिसून आले, परंतु पोलिस देखरेख पथक आणि कल्याणपूर पोलिस ठाण्याच्या दक्षतेने गूढ उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सखोल तपासानंतर पोलिसांनी हे बेपत्ता होण्याचे प्रकरण नसून, पूर्वनियोजित खून असल्याचे उघड केले.

खुनाची योजना दृश्यम चित्रपटापासून प्रेरित 

पोलिस तपासात निवृत्त रेल्वे गार्ड कमलापती तिवारी यांची हत्या त्यांचाच मुलगा गांधी तिवारी आणि मित्र ऋषभ शुक्ला यांनी केल्याचे उघड झाले. खून केल्यानंतर दोघांनी बॉलिवूड चित्रपट "दृश्यम" पासून प्रेरित होऊन पुरावे नष्ट करण्याची योजना आखली. हत्येनंतर, आरोपींनी मृतदेह कारमध्ये टाकून औरैया येथे नेला, तिथे तो कालव्याच्या काठावर टाकला आणि पेट्रोल टाकून जाळला. 

मालमत्तेचा लोभ
हत्येमागील हेतू कमलापती तिवारी यांची मालमत्ता हडप करणे हा होता. निवृत्त सुरक्षारक्षक कमलापती यांना पेन्शन आणि आठ दुकानांचे भाडे मिळत होते. मुलगा गांधी तिवारी याचा या मालमत्तेवर आणि संपत्तीवर डोळा होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, चौकशी सुरू आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, मालमत्तेचा लोभ एखाद्या व्यक्तीला किती खालच्या पातळीवर नेऊ शकतो. पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व तथ्ये न्यायालयासमोर सादर केली जातील.

Web Title: UP Kanpur Crime, Son kills father with help of friend, takes body 100 km away and burnt it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.