गर्लफ्रेंडसोबत मजामस्ती करत होता शिपाई, शेजाऱ्यांनी पाहिलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:31 IST2022-11-04T09:31:20+5:302022-11-04T09:31:31+5:30

इथे समेरपूर भागात अनेक वर्षांपासून तैनात शिपाई अमन सिंह याचा गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रसंग सुरु होता. शिपाई नेहमीच कांशीराम कॉलनीमध्ये जात होता आणि तिथे प्रेयसीसोबत मजा करत होता.

UP Hamirpur constable was with girl friend neighbors caught and beat him | गर्लफ्रेंडसोबत मजामस्ती करत होता शिपाई, शेजाऱ्यांनी पाहिलं आणि मग...

गर्लफ्रेंडसोबत मजामस्ती करत होता शिपाई, शेजाऱ्यांनी पाहिलं आणि मग...

यूपीच्या हरीमपूर जिल्ह्यात पोलीस खाकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रात्री एका हवालदार आपल्या प्रेयसीसोबत मजा-मस्ती करत होता. तेव्हाच तो अर्धनग्न अवस्थेत पकडला गेला. त्याला लोकांनी खूप मारहाण केली आणि त्याचा व्हिडीओही बनवला.

इथे समेरपूर भागात अनेक वर्षांपासून तैनात शिपाई अमन सिंह याचा गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रसंग सुरु होता. शिपाई नेहमीच कांशीराम कॉलनीमध्ये जात होता आणि तिथे प्रेयसीसोबत मजा करत होता. त्याला शेजाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं होतं.

पकडला गेल्यानंतर अर्धनग्न अवस्थेत असलेला शिपाई त्याला सोडण्याची मागणी करत होता. पण लोक त्याला पकडून त्याचा चेहरा दाखवण्यासाठी धावपळ करत होते. त्यानंतर पोलीस त्याला आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. 

समेरपूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षापासून तैनात शिपाई अमन सिंह समेरपूर भागातील एका तरूणीसोबत प्रेमप्रसंग सुरू होता. तो नेहमी तिच्या घरी येत जात होता. तिच्यासोबत मजा-मस्ती करत होता. ज्यावरून शेजाऱ्यांना समस्या होती.

गेल्या रात्री शिपाई जेव्हा तिच्या घरी पोहोचला तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना एका रूममध्ये रंगेहाथ पकडलं. तेव्हा तो अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. लोकांनी त्याला मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला.

Web Title: UP Hamirpur constable was with girl friend neighbors caught and beat him