प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:11 IST2025-07-07T11:11:43+5:302025-07-07T11:11:55+5:30

Crime News: तरुणीचे बऱ्याच वर्षांपासून एका तरुणासोबत अफेअर होते. परंतू, तिच्याशी लग्न करत नव्हता आणि तिचे दुसरीकडे लग्नही होऊ देत नव्हता. तिला स्थळ आले की तो नकार देण्यास सांगत होता.

UP Crime News: He wasn't letting his girlfriend get married, but now he's ready; her phone was busy, so he walked to her at night... | प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...

प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...

प्रेयसीचे लग्न न होऊ देणारा, मग तिचे दुसरीकडे लग्न ठरविले तर काहीही समस्या नाही असे सांगत तिला लग्न करण्यास सांगणाऱ्या बॉयफ्रेंडने मध्यरात्री तिचा फोन बिझी लागल्याने तिची हत्या केली आहे. यासाठी तो दोन किमी पायी चालत गेला होता. लग्न ठरलेल्या प्रेयसीसोबत वाद झाला आणि त्याने शेजारी असलेल्या कैचीने तिच्या गळ्यावर वार केले. यात तिचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी आरोपीला रविवारी पहाटे ३ वाजता घराजवळूनच अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे. ज्या तरुणीचे प्रेत मिळाले तिचे बऱ्याच वर्षांपासून एका तरुणासोबत अफेअर होते. परंतू, तिच्याशी लग्न करत नव्हता आणि तिचे दुसरीकडे लग्नही होऊ देत नव्हता. तिला स्थळ आले की तो नकार देण्यास सांगत होता. त्याचे ऐकून ही तरुणी लग्नास नकार देत होती. एकदा तर तिचे लग्नही ठरले होते, शगुन ही पोहोचला होता, त्याने नकार द्यायला सांगताच तरुणीने ठरलेले लग्न मोडले होते. अखेर यावेळी तो तयार झाला होता. 

तरुणीने त्याच्या सांगण्यावरून घरच्यांनी पाहिलेल्या मुलाला होकार दिला होता. आता नवे संबंध जुळत असल्याने ही तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी फोनवर रात्री बोलत होती. तेव्हा याला तिला भेटायची, पहायची इच्छा झाली. म्हणून बॉयफ्रेंडने प्रेयसीला फोन केला तर तो बिझी लागला. यामुळे बेचैन झालेल्या या प्रियकराने चालत चालत प्रेयसीचे घर गाठले व तिला फोन का उचलला नाहीस म्हणून विचारले. यावर तरुणीने त्याला ढकलले. याचा राग येऊन त्याने तिथेच असलेल्या कैचीने तिच्या गळ्यावर वार केले. 

पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडच्या मदतीने पुरावे गोळा करत आरोपीला पकडले आहे. लग्न झाल्यानंतर सारखा तिचा फोन व्यस्त येत होता, ४ जूनला रात्री १० वाजता तिच्याशी बोलणे झाले होते. परंतू  नंतर पुन्हा फोन केला तर तिचा सारखा बिझी लागू लागला होता. म्हणून त्याने तिचे घर गाठत तिच्या खोलीत एन्ट्री केली होती, खोलीतच तिच्याशी वाद झाला. जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला ढकलल. यानंतर झालेल्या झटापटीनंतर तिचा मृतदेह बेडच्या बाजुला सापडला होता. 

Web Title: UP Crime News: He wasn't letting his girlfriend get married, but now he's ready; her phone was busy, so he walked to her at night...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.