पहिल्या पत्नीला जास्त वेळ द्यायचा; दुसऱ्या पत्नीने झोपेतच दाबला गळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:26 IST2025-08-31T15:26:47+5:302025-08-31T15:26:58+5:30
UP Crime : या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले.

पहिल्या पत्नीला जास्त वेळ द्यायचा; दुसऱ्या पत्नीने झोपेतच दाबला गळा...
UP Crime : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पुरुषाने दोन लग्न केले होते. एक पत्नी त्याच्यासोबत राहत होती, तर दुसरी वडिलोपार्जित गावात. पती पहिल्या पत्नीकडे जास्त लक्ष देत होता, ते दुसऱ्या पत्नीला आवडत नव्हते. यामुळे दुखावलेल्या दुसऱ्या पत्नीने पतीचा झोपेतच गळा दाबून खून केला.
ही घटना मुझफ्फरनगरच्या तांडा माजरा गावातील आहे. येथे राहणारा ४० वर्षीय संजय कुमार याचे दोन लग्न झाले होते. संजयची पहिली पत्नी वडिलोपार्जित गावात राहते, तर दुसरी पत्नी कविता संजयसोबत राहत होती. २९ ऑगस्टच्या रात्री कविताने पतीचा गळा दाबून खून केला. संजयचे वडील भोपाळ सिंह यांनी या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कविताला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली.
कविताने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती सतत पहिल्या पत्नीला जास्त महत्त्व देत होता, तिच्याकडे लक्ष देत नव्हता. पतीच्या दुर्लक्षामुळे दुःखी होऊन तिने तिच्या पतीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.