तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह घेऊन पोलीस पळाले; आई पाठीमागे पळत राहिली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:51 IST2022-10-04T18:50:05+5:302022-10-04T18:51:41+5:30
एका अल्पवयीन तरुणीचा बलात्कार आणि खून झाल्याची घटना घडली आहे. खूनानंतर तिला नग्नावस्थेत शेतात फेकून दिले.

तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह घेऊन पोलीस पळाले; आई पाठीमागे पळत राहिली...
औरैया: उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. सकाळी आठ वाजता ती शेतात गेली, तेव्हा ही घटना घडली. मुलीच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरच तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. गँगरेपनंतर हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
बलात्काराची पुष्टी नाही
शवविच्छेदन अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही. तरुणीच्या एका डोळ्यावर सूज आणि ओठावर दाताच्या खुणा आढळल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून म्हणजेच गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मुलीचा नग्न मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिथे ग्रामस्थांचीही गर्दी होऊ लागली.
पोलिसांनी काढला पळ
यावळी पोलिसांनी तात्काळ मृतदेह पिशवीत भरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, मृतदेह घेऊन पोलीस तिथून पळू लागले. यावेळी मुलीची आई पाठीमागून धावत राहिली. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सुमारे 500 मीटर गेल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र, एसपी चारू निगम यांनी मृतदेह घेऊन पळून जाण्याच्या गोष्टीचा इन्कार केला आहे. ते म्हणाले, "शेतात मृतदेह आढळून आला, कार तिथून 500 मीटर अंतरावर होती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह कारपर्यंत आणला."
200 मीटरपर्यंत ओढत नेले
मृतदेह सापडलेल्या बाजरीच्या शेतात जवळपास 200 मीटरपर्यंत बाजरी तुटलेली आढळून आली. मातीवर ओढलेल्या खुणाही आढळल्या. मृत्यूपूर्वी मुलीने पळून जाण्यासाठी धडपड केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून चप्पल, अंडरगारमेंट याशिवाय इतर कपडेही जप्त केले आहेत. सध्या आरोपींच्या शोधासाटी 10 पथके रवाना झाली आहेत.