शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Unnao Rape Case : भाजपाच्या निलंबित आमदार कुलदीप सेंगरला १० वर्षाचा तुरुंगवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:58 PM

पीडित मुलीच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकुलदीप सिंग सेंगरला दिल्ली न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावत सेंगरची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. 

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कारप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंग सेंगरला दिल्ली न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासह या प्रकरणातील सर्व दोषींना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ४ मार्च रोजी दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने सेंगरसह सात जणांना दोषी ठरवत शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी कोर्टाने चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला.सेंगरसह त्याचा भाऊ अतुलला देखील या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. दोघांनाही १० लाखांचा दंड पीडित मुलीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठी आकारण्यात आला आहे. सेंगरने २०१७ मध्ये पीडित मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी कोर्टाने मुलीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावत सेंगरची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. गुरुवारी युक्तिवाद करताना सेंगरच्या वकिलाने सांगितले की, सेंगरला राजकीय कारकीर्द आहे, दरम्यान त्याने जनतेची सेवा केली आहे. विशेष न्यायाधीश धर्मेश शर्मा म्हणाले, ही घटना सेंगरच्या सांगण्यावरून घडली, घटनेवेळी तो तिथे उपस्थित देखील होता. हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाचे कुटुंब आहे, आपण एखादा गुन्हा करीत असताना याचा विचार केला पाहिजे. तुम्ही सिस्टमची चेष्टा केली.' असे म्हणत कोर्टाने सेंगरच्या वकिलाला फटकारले. 

उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित दोषी आमदाराच्या शिक्षेवर २० डिसेंबरला सुनावणी  

 

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

 

Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, पीडितेची मागणी

 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणMurderखूनCourtन्यायालयKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरBJPभाजपा