शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित दोषी आमदाराच्या शिक्षेवर २० डिसेंबरला सुनावणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 2:29 PM

आता २० डिसेंबरला सेंगरला शिक्षा काय होणार ? यावर सुनावणी होणार आहे.    

ठळक मुद्देआज कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत मागितली आहे. दोषी कुलदीपच्या वकिलांनी त्याचे सामाजिक आयुष्य पाहता कमीत कमी शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती केली आहे.

नवी दिल्ली - २०१७ साली  उत्तर प्रदेशात उन्नाव येथे तरुणीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला काल दोषी ठरवलं आहे. तर महिला सहकारी असलेल्या शशी सिंह यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. तीस हजारी कोर्टाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी हा निर्णय दिला असून सीबीआयने कोर्टात कुलदीपला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर दोषी कुलदीपच्या वकिलांनी त्याचे सामाजिक आयुष्य पाहता कमीत कमी शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती केली आहे. मात्र, आज कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत मागितली आहे. आता २० डिसेंबरला सेंगरला शिक्षा काय होणार ? यावर सुनावणी होणार आहे.    कोर्टाने १० डिसेंबरला सर्वच पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय १६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता. काल सुनावणीदरम्यान कोर्टाने सेंगरला दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण लखनऊहून दिल्लीतील तीस हजारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं. न्या. धर्मेश शर्मा यांनी ५ ऑगस्टपासून या प्रकरणावर प्रत्येक दिवशी सुनावणी सुरू केली होती. कोर्टाने पॉक्सो कायदा, कलम ३ व ४ आणि भा. दं. वि. कलम १२०ब (गुन्हेगारी कट), ३६३ (अपहरण), ३६६ (अपहरण आणि महिलेवर विवाहासाठी दबाव टाकणं), ३७६ (बलात्कार) असे गुन्हे निश्चित करण्यात आले आहेत. ४ जून २०१७ रोजी नोकरी देण्याच्या बहाण्यानं सेंगरनं सहकारी शशी सिंह हिच्यासोबत मिळून कट रचला आणि १६ - १७ वर्षांच्या तरुणीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

नेमकं काय आहे उन्नाव प्रकरण?पीडिता आणि तिच्या आईनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. पीडितेच्या वडिलांविरोधात ३ एप्रिल २०१८ रोजी  शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. २८ जुलै रोजी काकांना भेटून परतताना रायबरेलीत पीडिता, तिची काकी, मावशी आणि वकिलांच्या कारला एका ट्रकनं धडक दिली. यात काकी आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडितेचा वकीलही गंभीर जखमी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लखनऊहून दिल्लीला आणून जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे बरेच दिवस त्यांच्यावर उपचार झाले. सध्या पीडिता कुटुंबीयासोबत दिल्ली राहत असून, उन्नावमध्ये परतण्यास तिनं नकार दिला आहे.  

 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरCourtन्यायालय