उन्नाव कांड : मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबात वाद, वाटपावरून झाली हमरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:18 PM2021-02-25T12:18:22+5:302021-02-25T12:24:25+5:30

Unnao Case: उन्नावमध्ये दोन तरुणींच्या मृ्त्यूच्या घटनेवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पीडित तरुणींच्या कुटुंबाला मदतही जाहीर झाली होती.

Unnao Case: Dispute in the victim's family over the amount of aid | उन्नाव कांड : मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबात वाद, वाटपावरून झाली हमरीतुमरी

उन्नाव कांड : मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबात वाद, वाटपावरून झाली हमरीतुमरी

Next

लखनौ - उन्नावमध्ये दोन तरुणींच्या मृ्त्यूच्या घटनेवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पीडित तरुणींच्या कुटुंबाला मदतही जाहीर झाली होती. दरम्यान, या मदतीच्या रकमेवरून आता पीडितांच्या कुटुंबामध्ये वादाला तोंड फुटले आहे. (Dispute in the victim's family over the amount of aid)

कुटुंबातील सदस्यांनी देण्यात येणारी मदत ही वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मृत पीडितांच्या वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगत ही मदत आपल्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली आहे. तर पीडितेच्या आईने डीएमना पत्र लिहून पीडितेचे वडील हे मद्यपी असल्याचे सांगत ती मदत आपल्या खात्यात जमा करण्याची विनंती केली आहे.

उन्नाव हत्याकांडानंतर सरकराने दोन्ही मृत मुलींच्या वडिलांना पाच लाख रुपयांची मदत दिली होती. त्यानंतर मृत मुलीच्या बाबांनी दावा केला की त्यांनीच या मुलीला लहानाचे मोठे केले होते. ती आपल्याकडेच राहायची. त्यामुळे मदतीमधील अर्धी रक्कम आपल्याला मिळावी, अशी मागणी केली.

तर दुसऱ्या मुलीच्या आईने डीएमनां पत्र लिहून सांगितले की, तिचा पती व्यसनी आहे. त्याचे मानसिक बरोबर नसते. खात्यात पाच लाख रुपये आल्यापासून तो वेगळ्या घरात राहतो. कुटुंबाशी असलेले संबंध त्याने संपवले आहेत. त्यामुळे चार मुलांसोबत सुनेची जबाबदारी माझ्यावर पडली आहे. या कारणाने माझ्या पतीला मिळालेली आर्थिक मदत माझ्या खात्यात वळवण्यात यावी, असे या महिलेने सांगितले.

दरम्यान, मृत तरुणींच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, काल सकाळी मदतीच्या रकमेवरून पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा नातेवाईकांनी केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या कुटुंबीयांना पांगवले.

Web Title: Unnao Case: Dispute in the victim's family over the amount of aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.