विदेशात गेली, प्रेम झालं, संबंध बनवले, प्रेगनंट झाली; नवजात अर्भकाला १० व्या मजल्यावरुन फेकून दिलं, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:14 IST2023-04-21T15:13:17+5:302023-04-21T15:14:28+5:30
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका तरुणीने आई झाल्यानंतर नवजात अर्भकाला दहाव्या मजल्यावरून फेकून दिले. या संदर्भात तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे.

विदेशात गेली, प्रेम झालं, संबंध बनवले, प्रेगनंट झाली; नवजात अर्भकाला १० व्या मजल्यावरुन फेकून दिलं, धक्कादायक कारण आलं समोर
गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एका तरुणीने आई झाल्यानंतर आपल्या मुलाला दहाव्या मजल्यावरून फेकून दिल्याचे समोर आले आहे. नवजात बालकाची हत्या केल्यानंतर तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणीने चौकशीदरम्यान पोलिसांनाजवळ धक्कादाय खुलासा केला आहे. तरुणी परदेशात गेली होती तेव्हा तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध झाले. यादरम्यान तिचे प्रियकराशी संबंध होते, त्यामुळे ती गरोदर राहिली. अहमदाबादला परतल्यावर तिच्या ही बाब समजली. बदनामीच्या भीतीने त्या तरुणीने हे पाऊल उचलल्याचे आरोपी तरुणीने सांगितले.
धक्कादायक! न्यायालयाच्या आवारात वकील म्हणून आला अन् केला गोळीबार; पतीकडून महिलेवर हल्ला
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहमदाबादमधील चंद्रखेडा येथील ही घटना आहे. ही तरुणी काही काळापूर्वी परदेशातून परतली आहे. ती चंद्रखेडा येथील एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. येथे गेल्या काही दिवसांत तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र बदनामीच्या भीतीने तिने आपल्याच मुलीला दहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.
मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात चर्चेचा विषय बनला होता. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. बराच तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणीपर्यंत पोहोचून तिला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत तरुणीने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की ती परदेशात होती आणि तिथल्या एका तरुणाशी अफेअर दरम्यान ती गरोदर राहिली.