पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 15:33 IST2019-02-03T15:32:45+5:302019-02-03T15:33:43+5:30
आरोपीने तरुणीच्या घरात कोणी नसताना, जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या पालकांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गन्हा दाखल केला आहे. विक्की बाळू अडागळे (वय २२,संजय गांधीनगर ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने तरुणीच्या घरात कोणी नसताना, जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेच्या पालकांनी फिर्याद दाखल केली. आरोपीने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवले. नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबरचा शेवटचा आठवडा या कालावधीत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.