अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 21:25 IST2022-03-25T21:24:33+5:302022-03-25T21:25:31+5:30
Suicide Case : मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे.

अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य
इंदूरमधील द्वारकापुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुरू शंकर नगरमध्ये राहणाऱ्या नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. महिलेचे पोस्टमार्टम करताना तिच्या अंतर्वस्त्रातून ४ पानी सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने पती, सासू आणि नणंदेने छळ केल्याचे नमूद केलं आहे. महिलेला तिची सासरची मंडळी तिची सुसाइड नोट लपवतील असा संशय वाटत होता. यासाठी तिने अंतर्वस्त्रात ४ पानी सुसाइड नोट लपवली होतो. पोस्टमार्टम करताना डॉक्टरांना ही सुसाइट नोट सापडली. यानंतर त्यांनी ही नोट पोलिसांकडे दिली.
मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. प्रियंकाने सुसाइड नोटमध्ये सासू, पती आणि नणंदेने केलेल्या छळाबद्दल सांगितलं आहे. प्रियंका राहुलची दुसरी पत्नी होती. तिच्या म्हणण्यानुसार, पती तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होता आणि त्याने पहिल्या पत्नीच्या मुलीची हत्या केली असावी. या सर्व गोष्टी महिलेच्या सुसाईड नोटमध्ये सापडल्या आहेत.
सासूच्या छळाचा उल्लेख
पुढच्या पानावर पीडितेने लिहिले आहे की, तिची सासू पारुबाई तिला टोमणे मारते. ती विनाकारण त्रास देते. गेल्या वर्षभरात त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. सासू-सुनेशी झालेल्या वादाचा उल्लेख दोन पानांत करण्यात आला आहे. सुसाईड नोटच्या शेवटच्या पानात प्रियांकाने नणंद पिंकी आणि आशा यांच्या छळाचा उल्लेख केला आहे. माझा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, असे महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सासरच्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.