Underage student molestation in school premises | शाळा परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी
शाळा परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी

ठळक मुद्देपालकांमध्ये असंतोष : नागपुरातील अजनीत तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळा परिसरात शिक्षकातर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पालक बुधवारी अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जॉन तिमोथी (४५) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.
तिमोथी, कुकडे ले-आऊट येथील एका शाळेत संगीत शिक्षक आहे. पीडित ९ वर्षीय मुलगी चौथ्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील मुंबईत नोकरी करतात. ती आपल्या आजी-आजोबांसोबत राहते. असे सांगितले जाते की, काही दिवसांपूर्वी तिमोथी म्युझिक क्लास घेत होता. क्लास संपल्यावर त्याने पीडित मुलीला थांबवून ठेवले. तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. यामुळे मुलगी घाबरली. तिने आपल्या मैत्रिणींना घडलेला प्रकार सांगितला. वर्ग मैत्रिणींच्या बोलण्यामुळे ती आणखी घाबरली. या घटनेचा परिणाम तिच्या व्यवहारावर पडला. तिला मानसिक धक्का बसला. तिने आजी-आजोबांकडे डोके दुखत असल्याची तक्रार केली. आजोबांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती बिघडल्याने आईवडीलही नागपूरला पोहोचले. त्यांनी मुलीला विचारपूस केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. आई-वडिलांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यांनी पालकांसोबत अजनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल कली. पोलिसांनी छेडखानी व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिमोथीला अटक केली.
बुधवारी हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इतर पालकांनाही माहिती झाले. तिमोथीनी इतर मुलींसोबतही असेच कृत्य केल्याच्या शंकेने अनेक पालक शाळेत जमा झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसह नारेबाजी केली. पालक शाळेतून थेट अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले. मोठ्या प्रमाणावर पालक आल्याची माहिती होताच झोन चारच्या डीसीपी निर्मलादेवी ठाण्यात पोहोचल्या त्यांनी पालकांची भेट घेतली. पालकांनी त्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात एक निवेदनही सादर केले. निर्मलादेवी यांनी या प्र्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्का
या घटनेमुळे अल्पवयीन मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. घटनेमुळ पालक व नागरिकांमध्ये प्रचंड असतोष पसरला आहे. त्यांनी तिमोथीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. पोलिसांनी या घटनेलाही गांभीर्याने घेत आरापेीविरुद्ध कडक कारवाई केली.

 

Web Title: Underage student molestation in school premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.