VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:32 IST2025-07-30T14:41:56+5:302025-07-30T17:32:26+5:30

केरळमध्ये बसमध्ये मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Uncle caught molesting a girl in a Kerala bus girl slapping him hard | VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले

VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले

kerala Bus Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. रोज महिलांवरील अत्याचाराची, विनयभंगाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असतानाही महिलांच्या शोषणाचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दुसरीकडे मात्र आता महिलांकडे महिलाही आता अशा प्रकारांचा विरोध करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. अशीच एक घटना केरळमध्ये धावत्या बसमध्ये घडली. बसमध्ये एक वयस्कर व्यक्ती एका मुलीचा विनयभंग करत होता मात्र तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला आणि त्या व्यक्तीला सर्वांसमोर धडा शिकवला.  

केरळमधील बसमध्ये एका पुरुष मुलीची छेडछाड करतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मुलीच्या मैत्रिणीने संपूर्ण घटना रेकॉर्ड केली आणि त्या पुरूषाला जागीच धडा शिकवला. मुलीच्या मैत्रिणीने त्या व्यक्तीच्या जोरदार कानाखाली मारली आणि त्याला त्याच्या घाणेरड्या कृत्याबाबत जाब विचारला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना आजूबाजूचे प्रवासी शांतपणे बसून होते. प्रवाशांनी काय घडत आहे हे पाहिले सुद्धा नाही. मात्र त्या मुलींनी धैर्य दाखवत त्या व्यक्तीचा समाचार घेतला.

दोन मुलींच्या शेजारी हा व्यक्ती बसला होता. त्यावेळी मध्ये बसलेल्या मुलीला तो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन घाणेरडे कृत्य करत होता. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद करुन त्याला जाब विचारण्याचं ठरलं. त्यानंतर दुसऱ्या मुलीने उठून थेट त्या व्यक्तीच्या थोबाडीत लगावली. व्हिडीओमध्ये
मुलगी मल्याळम भाषेत त्या पुरूषाला शिवीगाळ करताना दिसत आहे आणि आरोपी हात जोडून माफी मागताना दिसत आहे. मुलीने कानाखाली मारताच त्या व्यक्तीचा चष्मा उडून पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


दरम्यान, त्या व्यक्तीवर काय कारवाई झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र मुलींनी दाखवलेल्या सजगपणामुळे त्या व्यक्तीला चांगलीच शिक्षा मिळाली.

Web Title: Uncle caught molesting a girl in a Kerala bus girl slapping him hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.