शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

चमकेच्या औषधावरून बेवारस मृतदेहाचा उलगडा; नवी मुंबई, मुंबई, पुण्यातील मजूर वस्त्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:33 IST

सीबीडी येथील पुलाखाली १७ एप्रिलला एका मजुराचा मृतदेह आढळला होता. दगडाने डोके ठेचून त्याची हत्या झाली होती. मात्र, मृताचे नाव व मारेकरी निष्पन्न झाले नव्हते. 

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - चमकेवरच्या औषधावरून हत्येचा गुन्हा उघड करून नवी मुंबई पोलिसांनी कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले. सीबीडी येथील पुलाखाली एका बेवारस व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघड करण्यासाठी पोलिसांना नवी मुंबई, मुंबई, पुण्यातील बेघर मजुरांच्या वस्त्यांची झाडाझडती घेतली. त्यातून हाती लागलेल्या सुभाष धुर्वे (२७) व अरविंद सकपाळ (३५) यांनी रोजच्या भांडणात दारूच्या नशेत मित्र आकाश राठोड (३१) याला संपविल्याची कबुली दिली.

कोणताही गंभीर गुन्हा घडला की पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहत असते. घटनास्थळावरील पुरावे गोळा करून त्यातून गुन्हेगारापर्यंतचा मार्ग शोधावा लागतो. त्यासाठी तपास पथकाला घटनास्थळावर जे मिळेल त्याकडे पुरावा म्हणूनच बघावे लागते. याच कौशल्याने सीबीडी येथील बेवारस व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. सीबीडी येथील पुलाखाली १७ एप्रिलला एका मजुराचा मृतदेह आढळला होता. दगडाने डोके ठेचून त्याची हत्या झाली होती. मात्र, मृताचे नाव व मारेकरी निष्पन्न झाले नव्हते. 

तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला दिशागुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सीबीडी, एनआरआय व नेरूळ पोलिस ठाण्यांची तीन पथके नेमली. तपासाला दिशा मिळत नसतानाच घटनास्थळी मिळालेले चमकेवरचे औषध नेमके कुठून घेतले असावे, हे पोलिसांनी तपासले असता औषधाच्या दुकानाचे सीसीटीव्हीतील फोटो हाती लागला. त्या आधारे मुंबईच्या काॅटन ग्रीन परिसरात १०० ते १५० मजुरांच्या झाडाझडतीत एक जण हाती लागला. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचेही नाव सांगितले. 

पोलिसांची २ दिवस पाळततपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची कल्पना देऊन त्याने संपर्क साधल्यास कळविण्यास सांगितले. त्याने पुण्यातून घरी फोन केला असता कुटुंबियांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. यावरून पथकाने पुण्याच्या गुलटेकडी परिसरात दोन दिवस पाळत ठेवून त्यालाही अटक केली.  बेलापूर येथील पुलाखाली किंवा जागा मिळेल तिथे रात्र काढून दिवसा मिळेल ते काम ते करायचे.

English
हिंदी सारांश
Web Title : Medicine clue solves murder case; police search labor camps.

Web Summary : Navi Mumbai police solved a murder using a medicine clue. Two men confessed to killing their friend in a drunken fight near CBD Belapur. Police investigated labor camps in Mumbai, Navi Mumbai and Pune.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी