शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 17:26 IST

दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात.

ठळक मुद्देनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना १५ ऑगस्टच्या आत बदल्या होईल असे सांगितले. अनेक पोलिस अधिकारी ती खासगीत बोलूनही दाखवत आहेत. शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनुसार, १ ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तो कधी होणार, तेदेखील स्पष्ट नाही. त्यामुळे बदलीची आस लावून बसलेल्या अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता तीव्र झाली आहे.

दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. यावर्षी मात्र कोरोनाने सर्वच विस्कळीत करून टाकले. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही विषय मागे पडला. दरम्यान, लॉक डाउन शिथिल करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात बदल्यांचे वारे वाहू लागले. 'बिगिनिंग अगेन'मुळे  हे वारे आणखीच गतिमान झाले. मात्र  बदलीच्या निर्णयाच्या संबंधाने रोजचा दिवस सारखाच निघत असल्याने  बदलीसाठी उत्सुक असलेल्या आयपीएस अधिकार्‍यांमध्ये  तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अनेक पोलिस अधिकारी ती खासगीत बोलूनही दाखवत आहेत. शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनुसार, १ ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे. मात्र, एकमत न झाल्यामुळे ती तशीच पडून आहे. प्रारंभी अयोध्येतील राम जन्मभूमि पूजनाचा सोहळा झाल्यानंतर यादी निश्चित करून बदल्या जाहीर करण्याचे ठरले होते. त्यामुळे ६ ऑगस्ट पासून बदलीच्या तयारीत असलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आपली तयारी करून ठेवली आहे. आज होणार, उद्या बदली होणार, असे निरोप मिळत असल्याने अनेक जण फोनोफ्रेंड करून एकमेकांकडे विचारणा करीत आहेत. अनेक शिर्षस्थ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना दिलासा देत आहेत. मात्र, शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना १५ ऑगस्टच्या आत बदल्या होईल असे सांगितले. हे सांगताना सगळा विचार विमर्श करून बदलिबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगून अद्याप आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत काही निश्चित झाले नाही, असेही संकेत दिले आहे.बंदोबस्ताचे काय ?१५ ऑगस्टचा बंदोबस्त आणि नंतर सुरू होणारा गणेशोत्सव बंदोबस्त बदली झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना सूट होईल का, अशी शंका घेतल्यामुळे त्यांनी यावर काही बोलण्याचे टाळले. यावरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान एक आठवडा तरी बदल्या होणार नाही, असेही आता वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलू लागले आहेत.नागपुरातील पाच अधिकारी बदलणारबदलीची यादी जाहीर आल्यास कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर नागपुरातील पोलीस आयुक्तांसह किमान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. दुसरीकडे शहरातील क्राईम रेट कमी केल्यामुळे पोलीस आयुक्तांना आणखी काही महिने येथेच ठेवले जाऊ शकते, असेही मत काही अधिकारी मांडत आहेत. 

बदल्याबाबतची पूर्व प्रक्रिया झाली आहे. थोडी फार जी आहे, त्यावर निर्णय घेऊन लवकरच बदल्या केल्या जातील. - अनिल देशमुख, गृहमंत्री

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू                

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालयnagpurनागपूर