Video : उल्हासनगरात सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांना ठेकेदाराकडून मारहाण, परस्पर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 08:40 PM2021-10-29T20:40:36+5:302021-10-29T20:48:02+5:30

शहरातील विकास कामासाठी महापालिकेकडे निधी नसतांना, खाजगी गृहसंकुलात गार्डन बांधण्याला १० लाखाचा निधी दिलाच कसा? असा प्रश्न खानचंदानी यांनी केला. 

Ulhasnagar, social worker Sarita Khanchandani was beaten up by a contractor and a case was registered | Video : उल्हासनगरात सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांना ठेकेदाराकडून मारहाण, परस्पर गुन्हे दाखल

Video : उल्हासनगरात सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांना ठेकेदाराकडून मारहाण, परस्पर गुन्हे दाखल

Next

सदानंद नाईक -

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील गृहसंकुलात महापालिका निधीतून बांधण्यात येत असलेल्या गार्डनला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी व ठेकेदार अजय सेवानी यांच्यात धक्काबुक्की व हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, खाजगी गृहसंकुलतात महापालिकेने गार्डन बनविण्यासाठी निधी दिलाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ ओटी सेक्शन परिसरातील एका खाजगी गृहसंकुलात ४ विंग असून एका विंगमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी तर दुसऱ्या विंगला ठेकेदार अजय सेवानी राहतात. गृहसंकुलाच्या खुल्या जागेवर एक गार्डन बांधण्याची मागणी गृहासंकुलातील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने छोटे गार्डन बांधण्यासाठी १० लाखाच्या निधीला मंजुरी दिल्यावर, गार्डन बांधण्याचे काम सेवानी यांना मिळाले, यानंतर त्यांनी गार्डनचे काम सुरू केले. दरम्यान सरिता खानचंदानी यांनी गार्डन बाबत महापालिकेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवून त्या बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांना अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही. शहरातील विकास कामासाठी महापालिकेकडे निधी नसतांना, खाजगी गृहसंकुलात गार्डन बांधण्याला १० लाखाचा निधी दिलाच कसा? असा प्रश्न खानचंदानी यांनी केला. 



 

सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी या शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता मोबाईलवर परिसराची रेकॉर्डिंग करीत होत्या. त्यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदार अजय सेवानी यांच्यासोबत वाद होऊन दोघात धक्काबुक्की झाली. दोघांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकमेकां विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून दोघांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी दिली. मात्र महिलेला धक्काबुक्की करण्याच्या प्रकारचा सर्वस्तरातून निषेध होत असून महापालिका कारभारावर झोड उठली आहे. शहरात विकास कामाला निधी नसतांना खाजगी गृहसंकुलमध्ये गार्डन बांधण्याला १० लाखाचा निधी दिलाच कसा? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Web Title: Ulhasnagar, social worker Sarita Khanchandani was beaten up by a contractor and a case was registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.