ugarcane trolley was hit and a Uttur trader was killed on the spot | उसाच्या ट्रॉलीला धडक बसून उत्तूरचा व्यापारी जागीच ठार 

उसाच्या ट्रॉलीला धडक बसून उत्तूरचा व्यापारी जागीच ठार 

उत्तूर : गडहिंग्लज - कडगाव मार्गावरील तीन चिंचे जवळ थांबलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसल्याने उत्तूर. ता. आजरा. येथील कापड दुकानदार दत्तात्रय रामचंद्र पाटील वय - ४५  हे जागीच ठार झाले . हा अपघात सांयकाळी  साडेसातच्या सुमारास घडला.


            अधिक माहिती अशी दत्ता पाटील . हे आपल्या दुचाकीवरून  एम.एच. ०९ एं एक्स् ९११६ वरून गडहिंग्लज येथून उत्तूर कडे जात होते .कडगाव ता. गडहिंग्लज येथील तीन चिंचे जवळ ऊसाच्या ट्रॉली ला जोराची धडक बसल्याने पाटील हे खाली पडले .. तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेत असताना उपचारापुर्वीच निधन झाले. पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.


  तीन महिन्यापुर्वी दुकान 
तीन महिन्यापुर्वी पार्टीत कलेक्शन नावाने त्यांनी उत्तूर बायपास रोडवर कापड दुकान घातले होते . त्यांचे मूळ गाव शिप्पूर ता. गडहिंग्लज आहे . त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिप्पूर, उत्तूरवर शोककळा पसरली आहे.

Web Title: ugarcane trolley was hit and a Uttur trader was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.