शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या शिंप्याची निर्घृण हत्या, दुकानात घुसून चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:29 IST

राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंप्याची दुकानात घुसून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे.

Udaipur Murder Case: राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे एका शिंप्याची दुकानात घुसून हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी शिंप्याचा गळा निर्घृणपणे चिरला.

गळा चिरुन हत्याउदयपूरमधील मालदास स्ट्रीट परिसरात ही भीषण घटना घडली आहे. कन्हैया लाल असे मृत शिंप्याचे नाव आहे. शिंप्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मृत व्यक्तीच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपींनी शिंप्याची निर्घृण हत्या केली. 

शहरात हत्येचा निषेधविशेष म्हणजे हत्येची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवली. या क्रूर घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनी निदर्शने केली. यावेळी तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात आहे. तसेच, पुढील 24 तास इंटरनेट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारल्याने, मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, 'उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिस गुन्ह्याचा योग्य तपास करत आहेत. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.'

भाजपचा गेहलोत सरकारवर निशाणा

भाजप नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विट करत गेहलोत सरकारवर निशाणा साधला. 'उदयपूरमधील या घृणास्पद घटनेला गेहलोत सरकार जबाबदार आहे. या सरकारने करौली दंगलीच्या मुख्य दंगलखोराला मोकळे सोडले. टोंकमध्ये मौलानाने हिंदूंचे गळे कापण्याची धमकी दिली होती, त्यावर कारवाई झाली नाही. हा मारेकरी व्हिडिओ बनवून हत्याकांडाच्या धमक्याही देत ​​राहिला, पण सरकार गप्प बसले,' असे ते म्हणाले.

दुसरीकडे, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, 'दोन मुस्लिमांनी उदयपूरमधील हिंदू दुकानदार कन्हैया लालची त्याच्या दुकानात हत्या केली. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून याची जबाबदारीही घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना शस्त्रे दाखवून धमकीही दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत गप्प आहेत,' असे म्हटले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस