लेसबियन म्हणत दोन तरुणींना बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टला शॉक देऊन बलात्काराचा प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:37 IST2022-11-08T17:37:17+5:302022-11-08T17:37:51+5:30

तरुणी बेडवर आराम करत होत्या, तेवढ्यात आरोपी घरात शिरले अन्...दोघे अटकेत

Two young women were brutally beaten in Murshidabad west bengal; Rape attempt by giving shock to private part... | लेसबियन म्हणत दोन तरुणींना बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टला शॉक देऊन बलात्काराचा प्रयत्न...

लेसबियन म्हणत दोन तरुणींना बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टला शॉक देऊन बलात्काराचा प्रयत्न...

मुर्शीदाबाद: देशात LGBTला मान्यता मिळाली आहे. पण आजही अशी नाती न स्वीकारणारे आणि याला पाप म्हणणारे अनेकजण देशात आहेत. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे. तिघांनी मिळून दोन मुलींना बेदम मारहाण केली. यानंतर एकीच्या प्रायव्हेट पार्टही शॉकही दिला. तसेच दोघींवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. 

आरोपी तरुणीचे नातेवाईक
गंभीर जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी सागरदिघी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलींवर अत्याचार करणारे दोन आरोपी त्यांचेच नातेवाईक आहेत. तर तिसरा आरोपी त्यांचा शेजारी आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरूच आहे.

नेमकं काय झालं?
दोन्ही मुलींचे वय 21 ते 22 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, आम्ही दोघी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही रोज एकमेकींना भेटतो. 25 ऑक्टोबरला माझ्या मैत्रिणीने मला फोन करून ती आजारी असल्याचे सांगितले. मग तिने मला घरी बोलावले. रात्र झाली होती, म्हणून तिच्याच घरी थांबले.

एकत्र झोपण्यास आक्षेप घेतला
मुलीने पुढे सांगितले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीचे दोन नातेवाईक अचानक खोलीत आले. त्यांच्यासोबत एक शेजारीही होता. तिघांनी आम्हाला विचारले की आम्ही एकाच बेडवर का झोपतोय? मग आम्ही म्हणालो की आम्ही दोघी मैत्रिणी आहोत म्हणूनच. पण ते लोक म्हणाले की आम्हाला तुमच्या नात्याबद्दल सर्व माहिती आहे. यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. आम्ही दोघींनी विरोध केला असता, त्यांनी आतून इलेक्ट्रिक रॉड आणून माझ्या मैत्रिणीचा प्रायव्हेट पार्टला शॉक दिला. यानंतर तिघेही तेथून पळून गेले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली.
 

Web Title: Two young women were brutally beaten in Murshidabad west bengal; Rape attempt by giving shock to private part...