अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या दोन महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 10:06 IST2021-02-04T10:05:49+5:302021-02-04T10:06:04+5:30
एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर गेल्या दुसऱ्या महिलेस वाहनाने 50 मीटरपर्यंत फरफटत नेले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या दोन महिला जागीच ठार
जळगाव - मॉर्निंग वाक करुन परतत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या. ही घटना सामनेर ता.पाचोरा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेश दारासमोर गुरुवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
मनीषा साहेबराव पाटील( वय ५०) व अनिता सहादू पाटील (वय ४८) अशी या ठार झालेल्या महिलांची नावे आहेत या महिला मॉर्निंग वॉक करून परत येत असताना ही घटना घडली. धडक एवढी जोरात होती की दोघी महिला जागीच गतप्राण झाल्या. एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर गेल्या दुसऱ्या महिलेस वाहनाने 50 मीटरपर्यंत फरफटत नेले. पाचोरा पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल मोरे, रामदास चौधरी पुढील तपास करीत आहेत.