शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सुनील झंवरला अटकेपासून दोन आठवडे संरक्षण, विशेष न्यायालयात दाद मागण्यास मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:52 IST

Sunil Zanwar News : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे.

जळगाव -  बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. मुळ फिर्याद रद्द करण्यासाठी झंवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर कामकाज करताना मंगळवारी न्यायालयाने एक आठवड्यात झंवर याने पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जावून अटकपूर्व जामीनासाठी जावे व त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल द्यावा असा निर्णय दिला आहे. (Two weeks protection from arrest of Sunil Zanwar, time limit to appeal in special court)दरम्यान, दुसरीकडे झंवर व जितेंद्र कंडारे मिळून येत नसल्याने पुण्याच्या विशेष न्यायालयाने दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रीया सुरु केली असून शरण येण्यासाठी १० मार्च अंतिम तारीख दिली आहे. त्यांच्या घरासह, पोलीस ठाणे, न्यायालय आवार आदी ठिकाणी नोटीसाही डकविण्यात आलेल्या आहेत. त्यात मंगळवारी उच्च न्यायालयाने झंवरला दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. याबाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे.पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीणमधील एक अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. त्यानेही उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे महावीर जैन यानेही उच्च न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव