शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात जबरदस्तीने हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी दोन वाहतूक पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 11:42 IST

चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.

ठळक मुद्देदुचाकीस्वाराला केली मारहाण : सीमकार्डही घेतले काढून

पुणे : दुचाकीचालकावर कारवाई न करता १ हजार रुपयांची मागणी करुन लायन्सन जप्त केले़. तसेच चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दोन वाहतूक पोलिसांना निलंबित केले आहे़. ही घटना १० जून रोजी अलका टॉकिजजवळील टिळक चौकात घडली़. पोलीस हवालदार सुनिल ज्ञानदेव डगळे आणि पोलीस नाईक निलेश रावसाहेब काळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत़. याबाबतची माहिती अशी, या दोघांची विश्रामबाग वाहतूक विभागात नेमणूक होती़. १० जून रोजी ते टिळक चौकात कर्तव्यावर असताना कृष्णा काळे हे मेसमधून जेवण घेऊन विना हेल्मेट टिळक चौकातून जात होते़. त्यावेळी डगळे आणि काळे यांनी त्यांना अडवून १ हजार रुपयांची मागणी केली व त्यांचे लायसन्स ठेवून घेऊन त्यांना जाऊ दिले़. काही वेळाने काळे हेल्मेट घेऊन आले व माझ्याकडे हेल्मेट आहे, माझे लायसन्स परत द्या, अशी विनंती केली़. त्यावरुन त्यांच्या शाब्दिक वाद झाला़. तेव्हा काळे हे तेथून दूर जाऊन मोबाईलवर चित्रण करु लागले़ हे पाहिल्यावर डगळे व निलेश काळे यांनी कृष्णा काळे यांना पकडून धक्काबुक्की करीत संभाजी चौकीत घेऊन गेले़. त्याठिकाणी त्यांनी काळे यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला़. त्यातील सीम कार्ड व मेमरी कार्ड घेतले़. त्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई अनिल जामगे यांच्याबरोबर टिळक चौकात पाठविले़ तेथे त्यांना गाडीवर बसवून फोटो काढून घेतले व त्यांच्यावर हेल्मेट कारवाई केली़. त्यानंतर कृष्णा काळे यांनी मित्रांना बोलावून चलन पेड केले़. कृष्णा काळे यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली़. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आल्यावर त्यात तथ्य आढळल्याने पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे़. तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उपायुक्त पंकज देशमुख यांनी काढले आहेत़. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबन