शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'विलास तोगे'ला साथ देणारे खंडणीविरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:55 IST

दुकानदारावर दबाव आणून ५० हजार रुपये दे,नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करतो, अशी धमकी दिली.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तोगेविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास तोगे प्रकरणी खंडणीविरोधी पथकातील दोन पोलिसांना भोवले असून, बेकायदेशीरपणे दुकानातील डीव्हीआर जप्त केला व तो देण्यासाठी लाच मागण्यास प्रोत्साहितकेल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक पोलीस फौजदार प्रसाद मोकाशी, पोलीस नाईक संदीप पोपट साबळे अशी त्यांची नावे आहेत.याबाबतची माहिती अशी, शहरात लॉकडाऊनच्या काळात तंबाखुजन्य पदार्थ विकण्याचा बंदी आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी असताना अनेक दुकानदार तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. वारजे येथील एका चहा विक्री करणार्‍या दुकानदाराकडे गुटखा सापडला नसतानाही तू गुटखाविक्री करतो असे सांगून १९ मे रोजी मोकाशी व साबळे यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय दुकानावर छापा घातला. तेव्हा दुकानदाराने आपल्या ओळखीच्या हवालदार विलास तोगे यांना बोलविले. त्याच्याबरोबर आणखी एक बाळासाहेब चव्हाण ही व्यक्ती होती. चौघांनी मिळून दुकानदारावर दबाव आणून ५० हजार रुपये दे, नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करतो, अशी धमकी दिली. तेव्हा यादुकानदाराने इतके पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा जेवढे असतील तेवढे घेऊन ये, असे सांगितले.  दुकानदाराकडून त्यांनी चव्हाणमार्फत ३८ हजार रुपये घेतले व उरलेले १२ हजार रुपये आणून देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्यादुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआर घेतला. तू याबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर तुझ्या सर्व धंद्याचे रेकॉर्डिंग यामध्ये आहे. ते आम्ही कोर्टात दाखवू. राहिलेले १२ हजार रुपये घेऊन ये व डीव्हीआर घेऊन जा, अशी धमकी दिली़ त्यानंतर त्यांना ते वारजे पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे गेल्यावर मोकाशी याने आम्ही तुझ्यावर नॉर्मल केस करतो. त्यानंतर चौघे निघून गेले. एका हवालदाराने त्यांना एक मेमो दिला. उरलेल्या १२ हजार रुपयांसाठी ते फोन करत होते. तेव्हा या दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने२० मे रोजी त्यांची तक्रार नोंदवून गुन्ह्याची पडताळणी केली. कडून त्यात विलास तोगे याने १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तोगेविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हावारजे पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केला.याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या गुन्ह्यात डीव्हीआर जप्त करण्याची आवश्यकता नसताना तो जप्त केला. तसेच वारजे पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यास कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोकाशी आणि साबळे यांना निलंबित करण्यात आले........

या प्रकरणातील विलास तोगे हा पूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात ६ वर्षे कार्यरत होता. त्या काळात त्याचा तेथे दरारा होत. पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक वरिष्ठ अधिकार्‍यांशी त्याचे मधुर संबंध असायचे. त्यामुळे हवालदार असूनही पोलीस अधिकारी त्याला वचकून असत. वारजेतही त्याची अशीच इमेज होती.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबन