शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

३ लाखांची लाच घेणारे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 21:39 IST

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी अटक पोलिसांची नावे आहेत.

ठळक मुद्देते दोघेही पालघर जिल्हयातील बोईसर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार यांनी लाचेची रक्‍कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ठाणे - अटक न करण्यासाठी 3 लाखांची लाच स्विकारणार्‍या दोन पोलीस उपनिरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. एकाच वेळी आणि एकाच प्रकरणात सहभाग असलेल्या 2 पोलीस उपनिरीक्षकांना 3 लाख रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी अटक पोलिसांची नावे आहेत.

ते दोघेही पालघर जिल्हयातील बोईसर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयात अटक न केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे तक्रारदारास 3 लाखाची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. 

तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने 12, 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्‍कम देताना दीड लाख रूपयाच्या खर्‍या नोटा तर दीड लाख रूपयाच्या डमी नोटा वापरण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार यांनी लाचेची रक्‍कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक