पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख खून प्रकरणी दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:34 IST2019-05-07T17:32:01+5:302019-05-07T17:34:13+5:30
पुणे- सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पाठलाग करुन अकरा गोळ््या झाडत पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खून करण्यात आला.

पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख खून प्रकरणी दोन जणांना अटक
पुणे : पुणे- सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पाठलाग करुन अकरा गोळ््या झाडत पुण्यातील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) दोन जणांना अटक केली आहे. या खुनापाठीमागे जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचे कारण असल्याचे समोर आले आहे.
हसन शेख हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी शेख हा नारायणपूर येथून त्याच्या कारने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी बोलेरोने त्याच्या कारला धडक दिली. त्यांनतर त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच त्याला कारच्या बाहेर काढत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.
शेख याच्यावर या आधी देखील 2015 मध्ये हॉटेल राज गार्डन येथे हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी देखील त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने तो काहीकाळ कोमात गेला होता. त्यातून बरा झाल्यानंतर त्याने हॉटेल व इतर व्यवसाय सुरु केले होते. पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर हल्ला करणा?्यांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा तशाच पद्धतीने शेख याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.