शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये नेत दोघांना सायबर गुन्ह्यासाठी जुंपले; आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:51 IST

दोन आरोपींना अटक, चिनी कनेक्शन समोर, थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे प्रलोभन.

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : मीरा रोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुकमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवत त्यांना थायलंडवरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबविण्यात आले. मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ ने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत दोघांना अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चीनचा असून, अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे प्रलोभन नयानगरच्या हैदरी चौक भागात राहणारा आसिफ खान ऊर्फ नेपाळी याने सय्यद इरतिझा हुसैन व अम्मार लकडावाला यांना दाखवले. ऑगस्ट २०२५ मध्ये आसिफ खान याने म्यानमार देशात असलेला त्याचा साथीदार अदनान शेख याच्या मदतीने दोघांना थायलंड येथे पाठवले. हुसेन व लकडावाला यांना थायलंडमधील इतर साथीदारांच्या मदतीने बेकायदा म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीकरिता पाठवले. 

अशी केली फसवणूक
याची माहिती बातमीदारांमार्फत मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ ला मिळाली होती.पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या पथकाने म्यानमारमध्ये डांबून ठेवलेल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फसगतीबद्दल सांगितले. त्या दोघांना म्यानमार देशातील युयू८ या सायबर फ्रॉड करणाऱ्या कंपनीत लिओ या चिनी आणि स्टिव्ह आण्णा या भारतीयाने भारतीय मुलींच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून दिले. 
त्याद्वारे परदेशातील भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांचा व्हाॅट्सॲप नंबर मिळवायचा व त्यांना क्रिप्टोकरन्सी व बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याचे काम करण्याचे प्रशिक्षण दिले व गुन्हा करण्याच्या कामास भाग पाडले. 

तरुणांच्या सुटकेसाठी सहा लाख केले वसूल 
पीडित दोन्ही तरुणांना कंपनीच्या इमारतीबाहेर जाण्यासही बंदी होती. काम न केल्यास त्यांचा शारीरिक छळ केला. या जाचातून सुटका करून घेण्यासाठी भारतीय चलनातील सहा लाख रुपये खंडणी म्हणून पाच भारतीय बँक खात्यांवर वसूल केले. खंडणीची रक्कम जमा झाल्यानंतरच त्यांची मुक्तता केली गेली.  मीरा रोडमध्ये परत आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनुसार नयानगर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपासात गुन्हे शाखेने एजंट आसिफ खान ऊर्फ नेपाळी याला नयानगरमधून अटक केली. तर खंडणीची रक्कम स्वीकारणाऱ्यांपैकी एक आरोपी रोहित कुमार मरडाणा (रा. विशाखापट्टणम) याला सुरत येथून अटक केली. अनेक टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे तरुणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Myanmar Cybercrime: Indian duo lured, forced; international gang exposed.

Web Summary : Two Mira Road men were trafficked to Myanmar for cybercrime after a fake job offer in Thailand. Police busted the international racket, arresting two. Victims were forced into fraud, extorted for release. A Chinese mastermind is suspected.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम