कासा येथे पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन सहकारी पोलीस एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 06:57 PM2021-07-06T18:57:14+5:302021-07-06T18:57:54+5:30

डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलीस यांनी संगनमताने एका तक्रारदार  गुन्ह्यत न गोवण्याच्या नावाखाली 10 हजाराची  लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पालघर ने अटक केली.

Two other fellow policemen including a police sub inspector caught by the ACB | कासा येथे पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन सहकारी पोलीस एसीबीच्या जाळ्यात

कासा येथे पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन सहकारी पोलीस एसीबीच्या जाळ्यात

Next

हितेंन नाईक
पालघर दि 6 जुलै:- डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलीस यांनी संगनमताने एका तक्रारदार  गुन्ह्यत न गोवण्याच्या नावाखाली 10 हजाराची  लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पालघर ने अटक केली.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन येथे दाखल अकस्मात मृत्यु प्रकरणी तक्रारदार असलेल्या  एका 45 वर्षीय  इसमावर गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवून पोलिसांनी लाचेची मागणी केली होती. तुला आरोपी न करता आम्ही मदत करू म्हणून कासा पोलीस उपनिरीक्षक हिम्मतराव सरगर, पोलीस शिपाई भास्कर सोनवणे व पोलीस नायक वैभव कामडी ह्यांनी सदर इसमाकडून 5 मे व 15 मे  ह्या दिवशी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.  या बाबतीत पोलीस नायक यांनी पोलीस उपनिरीक्षक यांना लाच देण्यासाठी तक्रारदार ह्यांना प्रोत्साहित केले होते. मात्र ह्याची तक्रार सदर इसमाने लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाकडून सापळा रचण्यात आला होता परंतु आरोपी ह्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचेचा स्वीकार केला नाही.

त्यांनतर पोलीस अधीक्षक ,एसीबी ठाणे कार्यालय कडून मंजुरी आदेश प्राप्त झाल्याननंतर  मंगळवारी 6 जुलै रोजी दुपारी दीड वाजता चे सुमारास आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर युनिट ने केली आहे. ह्यावेळेस  पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप , पोलीस नायक संजय सुतार, दीपक सुमडा/अमित चव्हाण, श्रद्धा जाधव, पोलीस शिपाई जितेंद्र उमतोल, सखाराम दोडे यांच्या टीम ने ही कारवाई केली.

Web Title: Two other fellow policemen including a police sub inspector caught by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.