गावठी कट्टाप्रकरणी दोघा उत्तर भारतीयांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:10 IST2024-01-03T15:10:36+5:302024-01-03T15:10:59+5:30
अमरनाथ योगेंद्रसिंग आणि अभिषेक अनिरुद्ध सिंग यांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता एक लोखंडी गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, एक सुरा, तीन मोबाइल सापडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

गावठी कट्टाप्रकरणी दोघा उत्तर भारतीयांना अटक
नवीन पनवेल : गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी अमरनाथ योगेंद्र सिंग (रा. पेंधर, मूळ बिहार) आणि अभिषेक अनिरुद्ध सिंग (मूळ, उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखा कक्ष तीनला तळोजा, पेंधरफाटा गावच्या हद्दीत पिस्टल घेऊन काहीजण विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. अमरनाथ योगेंद्रसिंग आणि अभिषेक अनिरुद्ध सिंग यांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता एक लोखंडी गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, एक सुरा, तीन मोबाइल सापडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.