आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं केलं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 20:50 IST2022-04-13T19:55:50+5:302022-04-13T20:50:26+5:30
Aryan Khan Drug Case : विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद अशी या निलंबित अधिकऱ्यांची नावे आहेत.

आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं केलं निलंबन
मुंबई - आर्यन खान प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी यासंबंधीचा तपास अहवाल सादर केल्यानंतर एनसीबीने ही मोठी कारवाई केली आहे. विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद अशी या निलंबित अधिकऱ्यांची नावे आहेत.
आशिष रंजन प्रसाद आणि व्ही. व्ही. सिंग अशी निलंबन करण्यात आलेल्या दोन एनसीबी अधिकाऱ्यांची नावं आहेत. कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपास पथकात या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याप्रकरणी एनसीबीवर आरोप होत असताना याप्रकरणी बऱ्याच तक्रारी अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. एनसीबी चुका करत आहे, बऱ्याच गुन्ह्यांमध्ये एनसीबीकडून योग्य तपास होत नाही असे आरोप नवाब मलिकांनीही केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे जो अहवाल आला होता यामध्ये या दोन अधिकाऱ्यांची नावं होती. या अहवालाच्या आधारेच या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या कारणामुळे त्यांच्यावर कारवाई केली गेली हे अद्याप समोर आलेलं नाही.