Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 23:21 IST2023-02-17T23:21:13+5:302023-02-17T23:21:32+5:30
सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक
मुंबई: क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला प्रकरणात भोजपुरी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यानुसार याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या तीन झाली असून अन्य पसार लोकांचा शोध सुरू आहे. त्यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांनतर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सुरुवातीला पृथ्वी शॉवर हल्ला करणारी ब्लॉगर आणि यूट्यूबर सपना गिल हिला पोलिसांनी अटक केली होती. ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटकेनंतर सपना गिलचे मेडिकलही करण्यात आले.
सेल्फीवरुन वाद
भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ याने सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी क्रिकेटरच्या कारवर हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. त्यानंतर काही लोक तेथे आले आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वीने नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या कारची तोडफोड केली आणि ५० हजार रुपयांची मागणीही केल्याचे सांगण्यात येत आहे.