नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:56 IST2024-10-11T19:56:24+5:302024-10-11T19:56:49+5:30
या घटनेनंतर नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
नोएडा : नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसबाहेर दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये गोळीबार झाला असून त्यात एक विद्यार्थी गोळी लागल्याने जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. याबाबत पोलिसांनी निवेदन जारी करून सांगितले की, ११ ऑक्टोबर रोजी सेक्टर १२५ रेड लाईटजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सेक्टर १२६ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास केल्यानंतर असे आढळून आले की, नरेंद्र भाटी यांचा मुलगा गौरीश भाटी (रा. सालारपूर) याच्या मांडीला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेला कारणीभूत असलेल्या व्यक्तीविरुद्ध पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. लवकरच या घटनेशी संबंधित व्यक्तीला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.