पुणे पुन्हा हादरले...दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा खून तर दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 22:17 IST2023-08-17T22:16:04+5:302023-08-17T22:17:40+5:30
पुणे शहरातील वानवडी परिसरातील सय्यद नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

पुणे पुन्हा हादरले...दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा खून तर दोघे गंभीर
- किरण शिंदे
पुण्यातील मंगला थिएटर बाहेर दोन दिवसांपूर्वीच सराईत गुन्हेगार नितीन म्हस्के याची दहा ते बारा जणांनी अतिशय निर्घृणरीत्या हत्या केली होती. या हत्याकांडातील आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत पुण्यात आणखी एकाचा खून करण्यात आलाय.आजीम शेख उर्फ अंत्या असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजीम शेख हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचीही माहिती समोर येते.. इतकच नाही तर पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे.
पुणे शहरातील वानवडी परिसरातील सय्यद नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि त्यातूनच आजीम शेख चा खून करण्यात आलाय.. प्राथमिक माहितीनुसार अजीम शेख आणि विरुद्ध गटामध्ये घरगुती कारणावरून वाद भडकला.. आणि त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले.. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.. आणि या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या अझीमचा मृत्यू झाला.. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी या दोघांची बोटे छाटली अशी माहिती देखील समोर येत आहे...
दरम्यान घटनेची गंभीरता पाहता स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.. पुणे पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.