भाऊ म्हणाला नाही म्हणून टोळक्याकडून दोन मित्रांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:15 IST2020-07-22T18:14:32+5:302020-07-22T18:15:23+5:30

लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबू व विटांनी केली मारहाण

Two friends beaten to 2 friends by gang for not saying a brother | भाऊ म्हणाला नाही म्हणून टोळक्याकडून दोन मित्रांना बेदम मारहाण

भाऊ म्हणाला नाही म्हणून टोळक्याकडून दोन मित्रांना बेदम मारहाण

पिंपरी : भाऊ म्हणाला नाही म्हणून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. यात दोन्ही मित्र जखमी झाले. किवळे येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
रुपेश तावरे, योगेश मानकेश्वर व त्यांचे सहा साथीदार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर रुषिकेश किसन मोहिते (वय २१, रा. एमबी कॅम्प, पाण्याच्या टाकीजवळ, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी मोहिते व त्यांचा मित्र अभिषेक अवघडे हे दोघे भाजी घेऊन घरी येत होते. किवळे येथे मोकळ्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी आरोपी तेथे आले. रुपेश भाऊ, असे का म्हणाला नाही म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबू व विटांनी मारहाण केली. जखमी झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर माहिते यांनी पोलिसांकडे मंगळवारी (दि. २१) तक्रार केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.

Web Title: Two friends beaten to 2 friends by gang for not saying a brother