प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, पोलीस स्टेशनसमोरच दोन्ही परिवार आपसात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:27 IST2021-08-17T12:24:40+5:302021-08-17T12:27:51+5:30

तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाला बघताच त्याला मारहाण सुरू केली. मुलाला मारताना बघून त्याचे कुटुंबियही मधे आले. अशात दोन्ही परिवारात मारहाण सुरू झाली.

Two family fight after love marriage in Madhya Pradesh | प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, पोलीस स्टेशनसमोरच दोन्ही परिवार आपसात भिडले

प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, पोलीस स्टेशनसमोरच दोन्ही परिवार आपसात भिडले

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील काही लोकांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, मारहाण करणारे लोक प्रेयसी आणि प्रियकराचे कुटुंबिय आहेत. या भांडणात दोन्ही पक्षाचे महिला आणि पुरूष सहभागी होते. पोलीस स्टेशन समोरच झालेलं हे भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना मधे यावं लागलं. 

रहली येथे राहणाऱ्या एका तरूणाचं आपल्या नातेवाईकाच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. दोन्ही परिवारांनी दोघेही बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दिली. गावात परत आल्यावर प्रेमी युगुल त्यांच्या लग्नाची सूचना देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. याची माहिती दोन्ही परिवारांना लागली आणि ते तिथे पोहोचले. (हे पण वाचा : Shocking! मुलीनेच केली मित्राच्या मदतीने वडिलांची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)

तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाला बघताच त्याला मारहाण सुरू केली. मुलाला मारताना बघून त्याचे कुटुंबियही मधे आले. अशात दोन्ही परिवारात मारहाण सुरू झाली. वाद वाढताना दिसला म्हणून पोलीस मधे आले आणि त्यांनी भांडण सोडवलं. नातेवाईक असल्याने दोन्ही कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. लग्नानंतर तरूणीला तरूणासोबत बघून तरूणीच्या घरातील लोक संतापले आणि बघता बघता हाणामारी सुरू झाली.
 

Web Title: Two family fight after love marriage in Madhya Pradesh