दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:13 IST2022-03-28T08:13:17+5:302022-03-28T08:13:42+5:30

खातिवली गाव हद्दीतील पाड्यावर राहणाऱ्या पीडित महिलांचे वय ७२ व ७४ वर्षे आहे

Two elderly women arrested overnight, 22-year-old arrested | दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक

दोन वृद्ध महिलांवर एकाच रात्री अत्याचार, 22 वर्षीय युवकाला अटक

लाेकमत न्यूज नेटवर्क
वासिंद : वासिंदजवळील खातिवली गाव हद्दीतील एका पाड्यात राहणाऱ्या दोन वयोवृद्ध महिलांवर एकाच रात्री लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

खातिवली गाव हद्दीतील पाड्यावर राहणाऱ्या पीडित महिलांचे वय ७२ व ७४ वर्षे आहे. शेजारी राहणाऱ्या या महिलांवर २० मार्चला रात्री १ च्या सुमारास आराेपीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित महिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वरठा यांच्या नेतृत्वाखाली  अटक केली. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात महिलांत भीतीचे व असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Two elderly women arrested overnight, 22-year-old arrested