Two died in majour accident on Mumbai-pune Express way near panvel | Accident: अपघातातील जखमींच्या मदतीसाठी थांबले; एक्स्प्रेस वेवर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Accident: अपघातातील जखमींच्या मदतीसाठी थांबले; एक्स्प्रेस वेवर टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पनवेल: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर किलोमीटर 8 च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्यांना मदत करायला थांबलेल्या पनवेलच्या रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते यांच्यासह अन्य एकाला आयशर टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 


तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (वय - 26) व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले व  इतर 2 जण त्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज  गाडी घेऊन थांबले होते. अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने  मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत सुशांत मोहिते वय - 26 यांचा मृत्यू झालेला असून त्यांचेसह प्रथमेश बहिरा (वय 24) यांचा देखील मृत्यू झाला आहे. हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले  हे या सुखरूप आहेत.

या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

या वेळी आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा - पळस्पे, देवदूत, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा  फोर्स यांनी मदत केली आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला आहे.

Web Title: Two died in majour accident on Mumbai-pune Express way near panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.