शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पालिकेचे दोन लाचखोर अभियंते एसीबीच्या जाळयात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 9:27 PM

Bribe Case : इमारतीच्या  नळजोडणीसाठी त्यांनी ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याच अर्जाचा पाठपुरावा करत असताना शिंदेने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली.

ठळक मुद्दे दुय्यम अभियंता सचिन गणपत खोदडे (३९) आणि विश्वभर प्रलहादराव शिंदे (२८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : नळजोडणीसाठी प्लम्बरकड़ून २ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या ई वॉर्डमधील दोन अभियंते एसीबीच्या जाळयात अडकले आहे. यात दुय्यम अभियंता सचिन गणपत खोदडे (३९) आणि विश्वभर प्रलहादराव शिंदे (२८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे  एका बांधकाम विकासकाकडील परवानाधारक  प्लम्बरकड़े अंडर लायसन्स प्लम्बर म्हणून काम करतात. ते काम करत असलेल्या विकासकाला एका इमारतीत पुनर्विकासाचे काम मिळाले होते. नमूद इमारतीच्या  नळजोडणीसाठी त्यांनी ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याच अर्जाचा पाठपुरावा करत असताना शिंदेने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली.  लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३० जुलै रोजी एसीबी कड़े धाव घेतली.     

पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी अर्जाबाबत विचारणा करताच त्यांनीही शिंदेची भेट घेण्यास सांगितले. पुढे सोमवारी एसीबीने सापळा रचत एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना शिंदेला रंगेहाथ पकड़ले. यात, खोदडेने त्याला पुढाकार दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका