दरड कोसळलेल्या दुर्घटनेबाबत वालीव पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात 2 गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:06 IST2022-07-14T16:06:18+5:302022-07-14T16:06:55+5:30
Vasai Landslide : बुधवारी चार सदस्यीय कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता.

दरड कोसळलेल्या दुर्घटनेबाबत वालीव पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात 2 गुन्हे दाखल
वसई भूस्खलनाच्या घटनेसंदर्भात वालीव पोलीस ठाण्यात मनपा सहायक आयुक्त नीलम निजाई यांनी तक्रार देऊन बुधवारी संध्याकाळी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात बुधवारी चार सदस्यीय कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता.
वालीव पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून हयगयीने मृत्यू घडविणे आणि अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एमआरटीपी या अंतर्गत जागामालक मेरी ग्रासीअस, शैलेंद्र निशाद, रतनेश पांडे, अनिलकुमार दुबे, अजित सिंग आणि नमूद जागेच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करण्याच्या कामात मध्यस्थी करणारा असे सहा आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी याबाबत पुष्टी देऊन गांभीर्याने याकडे लक्ष देऊन आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्याला दिले आहे.