हुंडय़ापायी छळ, मुंबईतील दोघांवर गोव्यात गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 22:57 IST2019-06-20T22:57:27+5:302019-06-20T22:57:40+5:30

हुंडयासाठी एका विवाहितेचा सासरी छळ केला होत असल्याची तक्रार गोवा पोलिसांनी नोंद करुन मूळ मुंबईतील विक्रोळी येथील दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.

Two cases of gang-rape in Mumbai, a crime in Goa | हुंडय़ापायी छळ, मुंबईतील दोघांवर गोव्यात गुन्हा नोंद

हुंडय़ापायी छळ, मुंबईतील दोघांवर गोव्यात गुन्हा नोंद

मडगाव - हुंडयासाठी एका विवाहितेचा सासरी छळ केला होत असल्याची तक्रार गोवा पोलिसांनी नोंद करुन मूळ मुंबईतील विक्रोळी येथील दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. इम्रान अयुब शेख व अश्फाक शेख अशी संशयितांची नावे आहेत. गोव्यातील मडगाव पोलीस ठाण्यात या दोघांवर भारतीय दंड संहितेंच्या 498 (अ), 323 व 506 कलमाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत.
पिडीत महिलेच्या भावाने यासंबधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. रफिक शेख हे तक्रारदार आहेत. आपल्या बहिणीचा हुंडयासाठी मानसिक व शारिरिक छळ केला जात असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली आहे. इम्रान हा तक्रारदाराच्या बहिणीचा नवरा आहे तर अश्फाक हा दीर आहे. 22 मे 2013 ते 15 जून 2019 दरम्यान छळवणुकीचा हा प्रकार चालू आहे. हुंडयापोटी 50 हजारांची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

Web Title: Two cases of gang-rape in Mumbai, a crime in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.