चक्क एक सिगारेट चोरली म्हणून केला खुनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 20:58 IST2018-07-27T20:57:28+5:302018-07-27T20:58:08+5:30

गोव्यातील बागा रिसॉर्टमधील घटना 

Trying to murder as a cigarette stole | चक्क एक सिगारेट चोरली म्हणून केला खुनाचा प्रयत्न 

चक्क एक सिगारेट चोरली म्हणून केला खुनाचा प्रयत्न 

मुंबई - गोव्यातील बागा रिसॉर्टमध्ये मित्राने सिगरेट चोरली म्हणून मित्रानेच चाकू खुपसून मित्राच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी  अटक केली असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोव्यातील बागा या रिसॉर्टमध्ये पश्चिम बंगालचा रहिवासी सैफुल सरकार आणि नेपाळचा रहिवासी असलेला ग्यान बहादुर हे दोन कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या सहकर्मचार्‍यांसोबत गोव्यात सुट्टीत मज्जा करण्यासाठी आले होते. तेव्हा ग्यान बहादुरने सैफुलची सिगरेट चोरली. हा राग मनात धरून सैफुलने चाकू खुपसून बहादुरला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सैफुल पलायन करण्याच्या मार्गावर होता. त्यांच्याच एका सहकर्मचार्‍याला बहादुर जखमी अवस्थेत सापडला. त्याने तत्काळ पोलिसांमध्ये तक्रार करून बहादुरला बांबोलिन रुग्णालयात  दाखल केले. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचप्रमाणे काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. एका प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने अवघ्या चार तासांच्याआत आरोपी सैफुलला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपी रात्रीच्या विमानाने फरार होण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी आरोपी सैफुलला पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Web Title: Trying to murder as a cigarette stole