ठाण्यात विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्ताला अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:34 IST2018-02-16T19:30:19+5:302018-02-16T19:34:35+5:30

The trustees who beat up the students in Thane are finally arrested | ठाण्यात विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्ताला अखेर अटक

ठाण्यात विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्ताला अखेर अटक

ठळक मुद्देशाळा गाठून पोलिसांनी केली इतर विद्यार्थ्यांकडे विचारणाविश्वस्ताला न्यायालयीन कोठडी


ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पोलिसांनी शाळा गाठून इतर विद्यार्थ्यांकडे त्यांना मारहाण झाली आहे का, याबाबत विचारणा केली. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदारांमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विद्यालयातील पाचवी ते दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांना विश्वस्त शिल्पा गौतम (४५) यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या पालकांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. तसेच हा प्रकार बुधवारी घडल्यानंतर गुरुवारी विद्यार्थी आणि पालक शाळेच्या आवारात एकत्र येऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, ठाणेनगर पोलिसांनी १८ विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, मारहाण आणि २०१५ च्या बालक अधिनियमानुसार शिल्पा गौतम यांच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तसेच शुक्रवारी सकाळी शिल्पा गौतम यांना अटक करत ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.
 

 

Web Title: The trustees who beat up the students in Thane are finally arrested