जीव वाचवण्यासाठी पुलावर लटकला, खाली पडताच डोकं जमिनीत रुतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 21:19 IST2022-02-24T21:19:46+5:302022-02-24T21:19:57+5:30
सुमारे दीडशे फूट उंचीवरुन पडल्याने व्यक्तीचं डोकं शेतातल्या जमिनीत रुतलं.

जीव वाचवण्यासाठी पुलावर लटकला, खाली पडताच डोकं जमिनीत रुतलं
भागलपूर:बिहारमधील भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील विक्रमशीला सेतू पुलावरून पडून ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात एवढा वेदनादायी होता की, ट्रक चालकाचे डोके दीड फूट जमिनीत रुतले. मृत चालक हा बांका येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रकची कारला धडक
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रकचालक अमितचा ट्रक पुलावर विरुद्ध बाजूने येणाऱ्या कारला धडकला. अपघातानंतर लोकांच्या जमावाने काही अंतरापर्यंत चालक अमित यादव याचा पाठलाग केला. लोक मारतील या भीतीपोटी अमितने विचित्र पाऊल उचलले. लोकांच्या भीतीपोटी अमित पुलाच्या रेलिंगला लटकला. पण, काही वेळानंतर त्याचा हात निसटला आणि तो सुमारे दीडशे फूट खाली मक्याच्या शेतात पडला.
डोकं जमिनीत रुतलं
इतक्या उंचावरुन खाली पडल्याने त्याचं डोकं दीड फूट मातीत रुतलं. या दुर्दैवी घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखाप झाली. काही काळ त्रास सहन केल्यानंतर अमितचा जागीच मृत्यू झाला. बरारी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मायागंज रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.