शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व्यथित बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 20:44 IST

Attempted self-immolation : ही महिला बागपत जिल्ह्यातील रहिवासी असून चार वर्षांपूर्वी शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका व्यक्तीसोबत तिचा विवाह झाला होता. तिने घटस्फोट, बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचार यासारख्या गंभीर कलमांखाली तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बलात्कार प्रकरणात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व्यथित होऊन, बलात्कार पीडित महिलेने बागपत जिल्ह्यातील महिला पोलिस स्टेशनबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिलेने पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलिसांनी आणि घटनास्थळी असलेल्या इतरांनी तिला वाचवले आणि तिने पेट्रोल प्यायल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले.अनेक महिन्यांपासून पोलीस स्टेशनच्या येरझऱ्या मारल्या ही महिला बागपत जिल्ह्यातील रहिवासी असून चार वर्षांपूर्वी शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका व्यक्तीसोबत तिचा विवाह झाला होता. तिने घटस्फोट, बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचार यासारख्या गंभीर कलमांखाली तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे ETV Bharat ने वृत्त दिले आहे.गेल्या चार महिन्यांपासून पोलीस ठाणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ती पीडित महिला फेऱ्या मारत असल्याचे त्या म्हणाल्या; एवढे करूनही पोलिसांनी तिच्या सासरच्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हताश झालेल्या महिलेने मंगळवार 24 मे रोजी कारवाईची मागणी करत नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठले. मात्र, तिची विनंती ऐकून न घेतल्याने तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.सासरच्यांविरुद्ध गुन्हे दाखलटाइम नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने असा आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी आणि चारचाकी वाहन आणि 4 लाख रुपयांची मागणी पूर्ण न करण्यासाठी तिचा छळ करत आहेत.तिने सांगितले की, पतीने तिच्या पोटात लाथ मारल्याने आणि सासरच्या लोकांनी सतत मारहाण केल्यामुळे तिला तीनदा गर्भपात झाला. तिने विरोध केला असता पतीसह इतरांनी तिला मारहाण करून घराबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिलेने पुढे सांगितले की, तिच्या दीराने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी या घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करून गुन्ह्याबद्दल बोलल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. तिने हे देखील सांगितले की, जेव्हा तिने गुन्हा माघार घेण्यास नकार दिला तेव्हा तिच्या पतीने तिहेरी तलाक घेणार असल्याचं सांगितले. घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे.महिलेने पुढे दावा केला की, चार पुरुषांनी तिच्या माहेरच्या घरात घुसून ७ मे रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या संदर्भात बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अद्याप कोणतीही कारवाई नाहीहे प्रकरण असूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की, कारवाई करण्याऐवजी तिची आई आणि भावाला कैराना पोलिसांनी कथित ऍसिड हल्ल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ