तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीची केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 02:06 PM2020-03-11T14:06:15+5:302020-03-11T14:12:20+5:30

जमिनीच्या वादातून मुलाचे धक्कादायक कृत्य

The triple murder, father and mother with sister were brutally murdered pda | तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीची केली निर्घृण हत्या 

तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीची केली निर्घृण हत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देवडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-८२), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-७५) आणि बहीण समुद्राबाई बिरादार (वय-६२) यांचा जमिनीच्या वादातून खून केला.घटनास्थळी उमदी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-५८) असे आरोपीचे नाव आहे.

सांगली - उमदी (ता.जत) येथे तिहेरी हत्याकांडाची थरारक घटना घडली आहे. उमदी गावामध्ये मुलाने आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केला. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-५८) असे आरोपीचे नाव आहे. त्याने वडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-८२), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-७५) आणि बहीण समुद्राबाई बिरादार (वय-६२) यांचा जमिनीच्या वादातून खून केला.


खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी उमदी पोलिस ठाणे याठिकाणी जाऊन हजर झाला आहे. घटनास्थळी उमदी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उमदी-जत रस्त्यावर  उमदी पोलीस ठाण्यापासुन काही अंतरावर ती ही घटना घडली.

 

Web Title: The triple murder, father and mother with sister were brutally murdered pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.