तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीची केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 14:12 IST2020-03-11T14:06:15+5:302020-03-11T14:12:20+5:30
जमिनीच्या वादातून मुलाचे धक्कादायक कृत्य

तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीची केली निर्घृण हत्या
सांगली - उमदी (ता.जत) येथे तिहेरी हत्याकांडाची थरारक घटना घडली आहे. उमदी गावामध्ये मुलाने आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केला. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-५८) असे आरोपीचे नाव आहे. त्याने वडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-८२), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-७५) आणि बहीण समुद्राबाई बिरादार (वय-६२) यांचा जमिनीच्या वादातून खून केला.
खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी उमदी पोलिस ठाणे याठिकाणी जाऊन हजर झाला आहे. घटनास्थळी उमदी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उमदी-जत रस्त्यावर उमदी पोलीस ठाण्यापासुन काही अंतरावर ती ही घटना घडली.
तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, आईवडीलांसह बहिणीचा केली निर्घृण हत्या https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/search/search/hatya/
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2020