शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

नागीन डान्स करून कोरोनावर उपचार; सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भोंदूूबाबाचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:07 IST

Nagpur police arrested bhondubaba : बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपोलिसांनी शुभम तायडे या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली असून, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर : नागपुरात अशाच एका भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम तायडे नावाचा हा बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता. अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता. आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावणाऱ्या ढोंगी बाबाचे कारस्थान एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने उधळून लावले. पोलिसांनी शुभम तायडे या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली असून, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीच अंनिसने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशीलनगरात राहणाऱ्या शुभम तायडे नामक गुणवंतबाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अंनिस कार्यकर्ते व पोलिसांच्या चमूने सापळा रचून त्याच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला. बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो व स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. त्याअनुषंगाने गुरुवारी बाबा पंचशीलनगर येथील स्वत:च्या घरी दर गुरुवारी दरबार थाटत होता. गुरुवारी १३ मे रोजी सापळा रचत पोलिसांनी रात्री ९ वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे, राज्यात टाळेबंदीबाबतचे कठोर निर्बंध असतानाही यावेळी तेथे ५० च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले. बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असे भक्त यावेळी सांगत होते. अशाच तऱ्हेने बाबा लोकांना स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून भीती दाखवत होता. मात्र, पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला. यावेळी पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ नुसार अटक केली. यासोबतच लॉकडाऊनमध्ये भक्तांना गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविराेधात दाखल करण्यात आला. यावेळी अंनिसचे महासचिव हरीश देशमुख, महिला संघटिका छाया सावरकर, महानगर सचिव नरेश निमजे उपस्थित होते. ही कारवाई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाणेदार युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक कृपेश घोळके, हेड कॉन्स्टेबल कैलाश चौहान यांनी केली.

अटकेविरोधात भक्तांची पोलीस ठाण्यात गर्दी

बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. बाबाला सोडण्याची मागणी व पोलिसांविरोधात घोषणाबाजी यावेळी केली जात होती. मात्र, तुमच्या समस्या अंतर्ज्ञानाने कळणाऱ्या बाबाला स्वत:वरील कारवाईबाबत का कळले नाही, असे जेव्हा समजावून सांगण्यात आले. तेव्हा भक्तांची गर्दी ओसरायला लागली.

टॅग्स :ArrestअटकnagpurनागपूरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या